Product SiteDocumentation Site

Red Hat Enterprise Linux 6

Release Notes

Red Hat Enterprise Linux 6.5 करिता प्रकाशन टिपा

Edition 5

Red Hat Engineering Content Services


Legal Notice

Copyright © 2013 Red Hat, Inc.
The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.
XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.
All other trademarks are the property of their respective owners.


1801 Varsity Drive
 RaleighNC 27606-2072 USA
 Phone: +1 919 754 3700
 Phone: 888 733 4281
 Fax: +1 919 754 3701

Abstract
प्रकाशन टिपा, Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये लागू केलेल्या सुधारणा व समावेषांचा उच्च स्तरिय अवलोकन पुरवते. Red Hat Enterprise Linux च्या 6.5 सुधारणाकरिता सर्व बदलांच्या तपशील दस्तऐवजीकरणकरिता, टेकनिकल टिपा पहा.

प्रस्तावना
1. कर्नल
2. नेटवर्किंग
3. सुरक्षा
4. सबस्क्रिप्शन व्यवस्थापन
5. वर्च्युअलाइजेशन
5.1. KVM
5.2. Microsoft हाइपर-व्हि
5.3. VMware
6. स्टोरेज
7. क्लस्टरिंग
8. हार्डवेअर समर्थन
9. व्यवसायीक मानक व सर्टिफिकेशन
10. डेस्कटॉप्स आणि ग्राफिक्स
11. कामगिरी आणि मापनीयता
12. कंपाइलर व साधने
A. कम्पोनंटची आवृत्ती
B. आवृत्ती इतिहास

प्रस्तावना

Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन स्वतंत्र सुधारणा, सुरक्षा व बग फिक्स एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 6.5 Release Notes मध्ये Red Hat Enterprise Linux 6 कार्यप्रणालीमधील मुख्य बदलांचे आणि किर्कोळ प्रकाशनकरिता सहाय्यक ॲप्लिकेशन्सकरिता दस्तऐवजीकरण आहे.ह्या किर्कोळ प्रकाशनतील बदलांविषयी (म्हणजेच, निवारण झालेले बग्ज, समाविष्टीत सुधारणा, आणि आढळलेले परिचीत अडचणी) तपशील टिपांकरिता टेक्निकल नोट्स पहा. टेक्निकल नोट्स दस्तऐवजात संपूर्ण सध्या उपलब्ध असलेले टेक्नॉलजि प्रिव्युउ व संबंधित संकुलांची सूची देखील समाविष्टीत आहे.

महत्वाचे

ऑनलाइन Red Hat Enterprise Linux 6.5 रिलिज नोट्स, जे ऑनलाइन येथे स्थीत आहे, यास परिपूर्ण, सर्वात नवीन आवृत्तीचे समझले जाते. प्रकाशन संबंधी प्रश्न असणाऱ्या ग्राहकांनी Red Hat Enterprise Linux च्या ठराविक आवृत्तीकरिता ऑनलाइन रिलिज आणि टेकनिकल नोट्सचा सल्ला घेणे शिफारसीय आहे.
Red Hat Enterprise Linux चक्र विषयी माहिती आवश्यक असल्यास, https://access.redhat.com/support/policy/updates/errata/ पहा.

Chapter 1. कर्नल

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये शिप केलेल्या कर्नलमध्ये अनेक बग फिक्सेस् व Linux कर्नलकरीता सुधारणा समाविष्टीत आहे. प्रत्येक निवारण केलेल्या बगच्या तपशीलकरिता व या प्रकाशनकरीता कर्नलमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक सुधारणाकरिता Red Hat Enterprise Linux 6.5 टेकनिकल नोट्स्.चे कर्नल विभाग पहा.

PMC-सिएरा कार्डस् व कंट्रोलर्सकरिता सपोर्ट

The pm8001/pm80xx ड्राइव्हर PMC-सिएरा अडॅप्टर सिरिज 6H व 7H SAS/SATA HBA कार्ड्स तसेच PMC सिएरा 8081, 8088, व 8089 चिप आधारित SAS किंवा SATA कंट्रोलर्सकरिता समर्थन पुरवतो.

नॉनरेस्पाँसिव्ह साधनांकरिता संरचनाजोगी वेळसमाप्ति

ठराविक स्टोरेज संरचनाकरिता (उदाहरणार्थ, अनेक LUNs सह संरचनांकरिता), SCSI एरर हाताळणी कोड मोठ्या प्रमाणात अनरेस्पाँसिव्ह स्टोरेज साधनांकरिता TEST UNIT READY सारखे आदेश पाठवण्यास घेतो. नवीन sysfs बाब, eh_timeout, यास SCSI साधन ऑब्जेक्टमध्ये समाविष्टीत करण्यात आले आहे, जे SCSI एरर हाताळणी कोडतर्फे वापरण्याजोगी TEST UNIT READY आणि REQUEST SENSE आदेशांकरिता वेळसमाप्ति मूल्यची संरचना स्वीकारते. ह्यामुळे ही अनरेस्पाँसिव्ह साधनांच्या तपासणीसाठी लागणारा वेळ कमी होतो. eh_timeoutचे पूर्वनिर्धारित मूल्य १० सेकंद आहे, जे ही कामगिरी समाविष्ट करण्यापूर्वीची वेळसमाप्ति मूल्य आहे.

त्रुटी पुनःप्राप्तिकरिता कमाल वेळची संरचना

नवीन sysfs बाब eh_deadline SCSI यजमान ऑब्जेक्टकरिता समाविष्ट केले आहे, जे संपूर्ण होस्ट बस अडॅप्टर (HBA) निष्क्रीय व पुन्हा सेट करण्यापूर्वी, SCSI त्रुटी हाताळणीतर्फे अडचण त्रुटी पुनःप्राप्तीकरिता प्रयत्नासाठी संरचीतजोगी कमाल वेळ सुरू करतो. ह्या बाबीचे मूल्य सेकंदामध्ये निर्देशीत केले जाते, व पूर्वनिर्धारित शून्य आहे, जे वेळ मर्यादा बंद करते व संपूर्ण त्रुटी पुनःप्राप्तिकरिता परवानगी देते. sysfsच्या वापर व्यतिरिक्त, eh_deadline कर्नल बाबीचा वापर करून सर्व SCSI HBAs करिता पूर्वनिर्धारित मूल्य सेट करणे शक्य आहे.

Lenovo X220 टचस्क्रीन सपोर्ट

Red Hat Enterprise Linux 6.5 आत्ता Lenovo X220 टचस्क्रीनकरिता समर्थन पुरवते.

Chapter 2. नेटवर्किंग

प्रिशिजन टाइम प्रोटोकॉल

Linux करिता IEEE मानक 1588-2008 नुसार प्रिशिजन टाइम प्रोटोकॉल (PTP)चे लागूकरण टेकनॉलजि प्रिव्युउ म्हणून Red Hat Enterprise Linux 6.4 मध्ये प्रस्तुत केले होते. PTP इंफ्रोस्ट्रक्चर, दोन्ही कर्नल व वापरकर्ता क्षेत्र, आत्ता संपूर्णतयाRed Hat Enterprise Linux 6.5 मध्ये समर्थीत आहे. नेटवर्क ड्राइव्हर टाइम स्टॅम्पिंग समर्थनमध्ये आत्ता खालील ड्राइव्हर्स देखील समाविष्टीत आहे: bnx2x, tg3, e1000e, igb, ixgbe, and sfc.

विना-संरचना IP मल्टिकास्ट IGMP स्नूपिंग डाटाचे विश्लेषण करत आहे

या अगोदर, ब्रिज मॉड्युल sysfs वर्च्युअल फाइल प्रणाली विना-संरचना IP मल्टिकास्ट इंटरनेट ग्रुप मॅनेजमेंट प्रोटोकॉल (IGMP) स्नूपिंग डाटाची चौकशी करण्याची सुविधा पुरवत नसे. ह्या कामगिरी विना, वापरकर्ते त्यांचे मल्टिकास्ट ट्राफिक विश्लेषीत करू शकत नसे. Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये, वापरकर्ते आढळलेले मल्टिकास्ट राऊटर पोर्ट्स, सक्रीय सबस्क्राइबर्ससह गट व संबंधीत संवाद ओळखत असे.

NetworkManager मधील PPPoE जोडणी समर्थन

पॉइंट-टू-पॉइंट प्रोटोकॉल ओव्हर इथरनेट (PPPoE) आधारित जोडणींचे निर्माण व व्यवस्थापनकरिता समर्थन पुरवण्यासाठी NetworkManager सुधारित केले आहे; उदाहरणार्थ, DSL, ISDN, आणि VPN जोडणीकरिता वापरले जाणारी जोडणी.

OpenStack करिता नेटवर्क नेमस्पेस समर्थन

नेटवर्क नेमस्पेसेस (netns) लाइटवेट कंटेनर-आधारित वर्च्युअलाइजेशन तंत्र आहे. वर्च्युअल नेटवर्क स्टॅक प्रोसेस गटसह संबंधीत असू शकते. प्रत्येक नेमस्पेसकडे स्वतंत्र लूकबॅक साधन व प्रोसेस क्षेत्र आहे. वर्च्युअल किंवा रिअल साधनांना प्रत्येक नेटवर्क नेमस्पेसकरिता समाविष्ट करणे शक्य आहे, आणि वापरकर्ता IP पत्ता लागू करू शकतो व त्यास नेटवर्क नोड म्हणून वापर करू शकतो.

क्रिप्टोग्राफि हँस फंक्शन बदलण्याकरिता SCTP सपोर्ट

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये, वापरकर्ते क्रिप्टोग्राफि हॅश फंक्शनला स्ट्रिम कंट्रोल ट्रांसमिशन प्रोटोकॉल (SCTP) जोडणींकरिता MD5 पासून SHA1 करिता बदलू शकतात.

SCTP करिता M3UA मोजमाप काउंटर्स

मेसेज ट्रांस्फर पार्ट लेव्हल ३ युजर अडॅप्टेशन लेयर (M3UA) हे IETF मानकतर्फे वर्णन केलेले प्रोटोकॉल आहे, जे पारंपारिक टेलिकम्युनिकेशन्स नेटवर्क्स (ISDN आणि PSTN) ऐवजी स्ट्रिम कंट्रोल ट्रांसमिशन प्रोटोकॉल (SCTP)चा वापर करून IP वरील MTP लेव्हल ३ वापरकर्ता भाग संकेत संदेश पाठवते.

iprouteचा वापर करून DOVE वाहिनींचे व्यवस्थापन

डिस्ट्रिब्युटेड ओव्हरले वर्च्युअल इथरनेट (DOVE) वाहिनी तुम्हाला वर्च्युअल एक्सटेंसिबल लोकल एरिया नेटवर्क (VXLAN) च्या बांधणीकरिता परवानगी देते, जे क्लाउड सेटंर्समध्ये ISO OSI लेयर २ नेटवर्क्सकरिता एक स्केलेबल पर्याय पुरवते. ब्रिज साधन iproute संकुलाचे भाग आहे व त्याचा वापर, उदाहरणार्थ, Linux प्लॅटफॉर्मवरील VXLAN साधनांकरिता फॉरवर्डिंग डाटाबेस व्यवस्थापनकरिता.

Chapter 3. सुरक्षा

FIPS 140-2 सर्टिफिकेशनशी संबंधीत बदल

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये, dracut-fips संकुल उपलब्ध असल्यास, कर्नल FIPS मोडमध्ये कार्य करतो किंवा नाही, ह्या उपेक्षित एकाग्रता तपासणी केली जाते. Red Hat Enterprise Linux 6.5 FIPS 140-2 सहत्व करण्याविषयी अधिक तपशील माहितीकरिता, खालील नॉलेज बेस पर्याय पहा:

OpenSSLला आवृत्ती 1.0.1 करिता सुधारित केले

ह्या सुधारणामुळे GlusterFS मध्ये ट्रांस्परेंट एनक्रिप्शन आणि ओळख पटवणे समर्थनकरिता आवश्यक असलेले खालील सिफर्स समाविष्ट केले जातात:
 • CMAC (सिफर-आधारित MAC)
 • XTS (XEX ट्विकेबल ब्लॉक सिफर विथ सिफरटेक्स्ट स्टिलिंग)
 • GCM (गालिओस किंवा काउंटर मोड)

OpenSSH मधील स्मार्टकार्ड समर्थन

OpenSSH आत्ता PKCS #11 मानकसह कंपाइल केले जाते, जे ओळख पटवण्याकरिता OpenSSH ला स्मार्टकार्डज वापरण्यासाठी कार्यान्वीत करते.

OpenSSL मधील ECDSA समर्थन

एल्लिपटिक कर्व्ह डिजिटल सिग्नेचर अल्गोरिदम (ECDSA) हे डिजिटल सिग्नेटर अल्गोरिदम (DSA)चा पर्याय आहे जे एल्लिपटिक कर्व्ह क्रिप्टोग्राफि (ECC)चा वापर करते. लक्षात ठेवा फक्त nistp256 आणि nistp384 वक्र समर्थीत आहे.

OpenSSL मधील ECDHE समर्थन

एफिमरल एल्लिपटिक कर्व्ह डिफ्फि-हेलमन (ECDHE) समर्थीत आहे, जे कमी कम्प्युटेशनल आवश्यकतासह परफेक्ट फॉरवर्ड सिक्रेसिकरिता सहमती देते.

OpenSSL आणि NSS मधील TLS १.१ आणि १.२ करिता समर्थन

OpenSSL आणि NSS आत्ता ट्रांस्पोर्ट लेयर सेक्युरिटि (TLS) प्रोटोकॉलची सर्वात नवीन आवृत्तीकरिता समर्थन पुरवतो, ज्यामुळे नेटवर्क जोडणींची सुरक्षा वाढते व संपूर्ण इंटरऑपरेबिलिटि इतर TLS प्रोटोकॉल लागूकरणसह कार्यान्वीत होते. TLS प्रोटोकॉल तुम्हाला क्लाएंट-सर्व्हर ॲप्लिकेशन्सला नेटवर्कशी संपर्क साधण्यास परवानगी देते जेणेकरूण इव्सड्रॉपिंग आणि टाम्परिंग टाळणे शक्य होते.

HMAC-SHA2 अल्गोरिदमचे OpenSSH समर्थन

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये, SHA-2 क्रिप्टोग्राफिक हॅश फंक्शनचा वापर आत्ता हॅश मेसेज ऑथेंटिकेशन कोड (MAC) निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे डाटा एकाग्रता कार्यान्वीत आणि OpenSSH मध्ये तपासणी शक्य होते.

OpenSSL मधील प्रिफिक्स मॅक्रो

openssl spec फाइल आत्ता प्रिफिक्स मॅक्रोचा वापर करते, ज्यामुळे पुनःवाटप करिता openssl संकुलचे पुनःबांधणी शक्य होते.

NSA स्विट बी क्रिप्टोग्राफि समर्थन

क्रिप्टोग्राफिक मॉडर्ननाइजेशन प्रोग्रामचा भाग म्हणून स्विट बि NSA तर्फे निर्देशीत क्रिप्टोग्राफिक अग्रोरिदमचा संच आहे. दोन्ही विना वर्गीकृत माहिती व सर्वोत्म वर्गीकृत माहितीकरिता इंटरऑपरेबल क्रिप्टोग्राफिक बेस म्हणून कार्य करते. ह्यामध्ये खालील समाविष्टीत आहे:
 • १२८ आणि २५६ बिट्स कि आकारासह ॲडवांस्ड एनक्रिप्शन स्टँडर्ड (AES). ट्राफिक फ्लोकरिता, AESचा वापर एकतर काउंटर मोड (CTR) सह कमी बँडविड्थ ट्राफिककरिता किंवा ऑपरेशनकरिता गालिओस किंवा काउंटर मोड (GCM) सह जास्त बँडविड्थ ट्राफिक आणि समतुल एनक्रिप्शनसाठी शक्य आहे.
 • एल्लिपटिक कर्व्ह डिजिटल सिग्नेचर अल्गोरिदम (ECDSA) डिजिटल स्वाक्षरी.
 • एल्लिपटिक कर्व्ह डिफ्फि-हेल्लमन (ECDH) कि करार.
 • सेक्युर हँश अल्गोरिदम २ (SHA-256 आणि SHA-384) संदेश डाइजेस्ट.

शेअर्ड प्रणाली सर्टिफिकेट्स

NSS, GnuTLS, OpenSSL आणि Java यांना पूर्वनिर्धारित सोअर्स शेअर करण्यास ठरवले आहे, प्रणाली सर्टिफिकेट अँकर्स आणि ब्लॅकलिस्ट माहितीची पुन्हप्राप्ति शक्य होते, जेणेकरूण स्टॅटिक डाटाचे प्रणाली-भर विश्वास कार्यान्वीत होते व त्याची सर्टिफिकेट ट्रस्ट निर्णयमध्ये क्रिप्टो टूलकिटतर्फे वापर होते. सर्टिफिकेट्सचे प्रणाली-स्तरीय प्रशासनमुळे वापर सोपे होते आणि स्थानीय प्रणाली वातावरण व कॉरपोरेट विस्तारतर्फे आवश्यक.

आइडेंटिटि मॅनेजमेंटमधील स्थानीय वापरकर्त्यांचे स्वयं सिंक्रोनाइजेशन

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये आइडेंटिटि मॅनेजमेंटमधील स्थानीय वापरकर्त्यांचे स्वयं सिंक्रोनाइजेशनमुळे केंद्रीय स्वरूपात स्थानीय वापरकर्त्यांचे व्यवस्थापन सोपे होते.

NSS मधील ECC सपोर्ट

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये नेटवर्क सेक्युरिटि सर्व्हिसेस (NSS) आत्ता एल्लिपटिक कर्व्ह क्रिप्टोग्राफि (ECC) करिता समर्थन पुरवते.

Chapter 4. सबस्क्रिप्शन व्यवस्थापन

Red Hat Support Tool

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये नविन संकुल समाविष्टीत आहे, redhat-support-tool, जे Red Hat Support Tool पुरवते. हे साधन कंसोल-आधारित Red Hatच्या सबस्क्राइबर सर्व्हिसेसच्या प्रवेशकरिता सुविधा पुरवते व Red Hat सबस्क्राइबर्सला Red Hat ग्राहक म्हणून उपलब्ध दोन्ही अंतर्भुत माहिती व सर्व्हिसेसकरिता आणखी संधी पुरवते. पुढे, ग्राहकांना हेल्पडेस्क सर्व्हिसेस एकत्रीत व स्वयंचलित करण्यासाठी सुविधा पुरवते. ह्या संकुलाच्या क्षमतामध्ये खालील समाविष्टीत आहे:
 • नॉलेज बेस लेख व पर्याय अवलोकन, कंसोलपासून (man पृष्ठे असे रूपण केले जाते).
 • कंसोलपासून ग्राहक घटनांचे अवलोकन, निर्माण, संपादन, व टिपण्णी पद्धती.
 • ग्राहक घटनाकरिता किंवा कंसोलपासून ftp://dropbox.redhat.com/ करिता प्रत्यक्ष अटॅचमेंट अपलोडिंग.
 • संपूर्ण प्रॉक्सी समर्थन (म्हणजेच, FTP व HTTP प्रॉक्सिज).
 • कंसोलपासून ग्राहक घटनांकरिता जोडणींचे सोपे सूची व डाउनलोड.
 • क्वेरि टर्म्स, लॉग संदेश, व इतर बाबी, व निवडजोगी सूचीमध्ये परिणामांच्या अवलोकनकरिता क्नॉजेज बेस शोध.
 • विश्लेषणकरिता लॉग फाइल्स, मजकूर फाइल्स, व इतर स्रोतचे Shadowman आपोआप अडचण ओळखण्यासाठीचे इंजिनच्या इतर स्रोतकरिता सोपे अपलोडिंग.
 • विविध इतर समर्थीत-संबंधित आदेश.
Red Hat Support Tool विषयी अधिक माहितीकरिता, /usr/share/doc/redhat-support-tool-version/ डिरेक्ट्रिमधील इंस्टॉल केलेले दस्तऐवजीकरण पहा किंवा खालील नॉलेज बेस लेख पहा: https://access.redhat.com/site/articles/445443.

subscription-manager listची सुधारणा

उपलब्ध सबस्क्रिप्शनच्या सूचीपैकी, subscription-manager list --available आदेशच्या आउटपुटमध्ये आत्ता नवीन क्षेत्र, Provides समाविष्टीत आहे. हे क्षेत्र उत्पादनांची नावे दाखवते ज्याकरिता प्रणाली पात्र आहे. ह्या व्यतिरिक्त, नवीन क्षेत्र, Suggested, यास सहत्वताकरिता व ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) सह पॅरिटि पुरवण्यास समाविष्ट केले आहे.

Chapter 5. वर्च्युअलाइजेशन

Red Hat Enterprise Linux 6.5 मधील वर्च्युअलाइजेशन सुधारणांमध्ये असंख्य बग फिक्सेस समाविष्टीत आहेत जसे कि लाइव्ह माइग्रेशन, एरर रिपोर्टिंग, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सहत्वता. ह्या व्यतिरिक्त, कामगिरी आणि सर्वसाधारण स्थीरता सुधारणा लागू केले आहे. ह्या बदलांविषयी सर्वात नवीन बाब पहाण्याकरिता, खालील विभाग पहा.

5.1. KVM

VMDK प्रतिमा फाइल रूपणकरिता सुधारित समर्थन

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये वर्च्युअल मशीन डिस्क, किंवा VMDK, प्रतिमा फाइल रूपण, उपरूपण समाविष्टीत, असंख्य VMware उत्पादकांतर्फे निर्मीत फक्त-वाचणीय सुधारणा समाविष्टीत आहे.

विंडोज गेस्ट एजंट संपूर्णतया समर्थीत

विंडोज अतिथी एजंट आत्ता संपूर्णतया समर्थीत आहे व सहाय्यक वाहिनीमध्ये virtio-win ड्राइव्हर्ससह एकत्रीतपणे स्वतःच्या इंस्टॉलरसह डिलिवर केले जाते.

VHDX प्रतिमा फाइल रूपणकरिता समर्थन

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये हायपर-व्हि वर्च्युअल हार्ड डिस्ककरिता, किंवा VHDX, प्रतिमा रूपण, Microsoft हायपर-व्हितर्फे निर्मीत असल्यास फक्त वाचणीय समर्थन समाविष्टीत आहे.

QEMU मध्ये GlusterFS करिता नेटिव्ह समर्थन

QEMU मधील GlusterFS करिता नेटिव्ह समर्थन, स्थानीयरित्या माउंट केलेल्या FUSE फाइल प्रणालीच्या वापर ऐवजी libgfapi लाइब्ररिचा वापर करून GlusterFS वॉल्युम्सकरिता नेटिव्ह प्रेवश स्वीकारतो. हे नेटिव्ह दृष्टिकोन बऱ्यापैकी कामगिरी सुधारणा पुरवते.

लाइव्ह वर्च्युअल मशीन्सच्या बाहेरिल बॅकअपकरिता समर्थन

यजमानवरील चालणारे तिसरे-पक्षिय ॲप्लिकेशन्स आत्ता अतिथी प्रतिमा अंतर्भुत माहितीकरिता फक्त वाचणीय स्वरूपात प्रवेश प्राप्त करू शकतात, ज्यामुळे फाइल्सचे प्रत बनवणे व बॅकअप्स घेणे शक्य आहे.

Linux अतिथींकरिता CPU हॉट प्लगिंग

CPU हॉट प्लगिंग आणि हॉट अनप्लगिंग QEMU अतिथी अजेंटसह Linux अतिथींवर समर्थीत आहे; अतिथी सुरू असताना CPUs सुरू किंवा बंद करणे शक्य आहे, अशा प्रकारे हॉट प्लग मिमिक करणे किंवा गुणविशेष विना प्लग करणे.

qemu-ga-win वरील VSS सपोर्टसह Microsoft Windows वरील ॲप्लिकेशन-सहत्व freeze आणि thaw

VSS (वॉल्युम शॅडो कॉपि सर्व्हिस) हे Microsoft Windows API आहे जे, इतर बाबींपैकी, योग्य, स्थीर फ्रीज आणि थॉ ऑपरेशन्सकरिता ॲप्लिकेशन्सकरिता सूचना पुरवते. ह्या गुणविशेषमुळे, वर्च्युअल मशीन कार्यरत असताना घेतेले स्नॅपशॉट्स संपूर्ण स्टॅककरिता स्थीर असतात (ब्लॉक लेअर ते अतिथी ॲप्लिकेशन्स) व त्यास बॅकअप कारणास्तव वापरणे शक्य आहे. अधिक माहितीकरिता, वर्च्युअलाइजेशन ॲडमिनिस्ट्रेशन गाइड पहा

qemu-ga हूक्सचा वापर करणारे Linux वरील ॲप्लिकेशन-सहत्व freeze आणि thaw

Windows VSS आवृत्ती प्रमाणे, अतिथीवरील कार्यरत QEMU अतिथी एजंटसह जुळणाऱ्या स्क्रिप्ट्स्चा वापर करून ॲप्लिकेशन-सहत्व स्नॅपशॉट्सचे निर्माण शक्य आहे. ह्या स्क्रिप्ट्स ॲप्लिकेशन्सला सूचीत करते जे freeze किंवा thaw ऑपरेशनवेळी डाटा डिस्कवर फ्लश करते, अशा प्रकारे सतत स्नॅपशॉट्स घेणे शक्य होते.

VMware OVF आणि Citrix Xen अतिथीचे KVM अतिथीकरिता रूपांतर

virt-v2v रूपांतरन साधनाला अपस्ट्रिम आवृत्तीकरिता सुधारित केले आहे ज्यामुळे KVM करिता VMware ओपन वर्च्युअलाइजेशन फॉरमॅट (OVF) आणि Citrix Xen गेस्ट रूपांतर शक्य होते.

वाढीव KVM मेमरि स्केलेबिलिटि

एका अतिथीमध्ये KVM वर्च्युअल मेमरि स्केलेबिलिटिला 4TB करिता वाढवले आहे.

Microsoft Windows अतिथी अंतर्गत ध्वनी नियंत्रणकरिता समर्थन

AC'97 कोडेकचा वापर करून वापरकर्ते आत्ता Microsoft Windows XP अतिथींवरील ध्वनी स्तर संपूर्णतया नियंत्रीत करू शकतात.

5.2. Microsoft हाइपर-व्हि

Microsoft हाइपर-व्हि पॅरा-वर्च्युअलाइज्ड ड्राइव्हर्स

Microsoft हायपर-व्हि वरील Red Hat Enterprise Linux सुधारित करण्यासाठी, सिनथेटिक व्हिडीओ फ्रेम बफर ड्राइव्हरला Red Hat Enterprise Linux 6.5 करिता समाविष्ट केले आहे. ह्या व्यतिरिक्त, यजमान आणि अतिथी अंतर्गत सिग्नलिंग प्रोटोकॉल सुधारित केले आहे. अधिक माहितीकरिता, वर्च्युअलाइजेशन ॲडमिनिस्ट्रेशन गाइड पहा

5.3. VMware

VMware प्लॅटफॉर्म ड्राइव्हर्स सुधारणा

VMware नेटवर्क पॅरा-वर्च्युअलाइज्ड ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रीम आवृत्तीकरिता सुधारित केले आहे.

Chapter 6. स्टोरेज

fsfreezeचे संपूर्ण समर्थन

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये fsfreeze साधन संपूर्णतया समर्थीत आहे. fsfreeze आदेश डिस्कवरील फाइल प्रणालीकरिता प्रवेश थांबवतो. fsfreeze ची रचना हार्डवेअर RAID साधनांशी वापरकरिता केला आहे, ज्यामुळे वॉल्युम स्नॅपशॉट्स्च्या निर्माणमध्ये सहायता प्राप्त होते. fsfreeze युटिलिटिविषयी अधिक तपशीलकरिता, fsfreeze(8) मॅन पृष्ठ पहा.

pNFS फाइल लेआउट हार्डनिंग

फिजिकल स्टोरेज साधनकरिता व पासून, pNFS पारंपारिक NFS प्रणालीला पारंपारिक NAS वातावरणात स्केल आउट करण्यास परवानगी देते, कम्प्युट क्लाएंट्स्ला प्रत्यक्षरित्या व परस्पररित्या डाटा वाचण्यास व लिहण्यास सुविधा पुरवते. NFS सर्व्हरचा वापर फक्त मेटा-डाटा नियंत्रीत करण्यासाठी आणि प्रवेश नियंत्रीत करण्यासाठी होतो, ज्यामुळे अनेक क्लाएंट्सपासून अधिक मोठ्या संचकरिता संभाव्य स्केलेबल प्रवेश प्राप्त होतो. ह्या प्रकाशनात pNFS करिता बग निवारण सादर केले जातात.

FUSE मध्ये Red Hat स्टोरेजचे समर्थन

FUSE (फाइलप्रणाली इन युजर स्पेस) मांडणी आहे ज्यामुळे कर्नलमध्ये विना बदल युजर क्षेत्रात फाइल प्रणालीचा विकास शक्य होतो. FUSEचा वापर करणाऱ्या वापरकर्ता क्षेत्र फाइल प्रणालींकरिता Red Hat Enterprise Linux 6.5 कामगिरी सुधारणा पुरवते, उदाहरणार्थ, GlusterFS (Red Hat Storage).

LVM थिन प्रोव्हिजनिंग आणि स्नॅपशॉट्स

लॉजिकल वॉल्युम मॅनेजरला थिन प्रोव्हिजनिंग समाविष्ट करण्यास सुधारित केले आहे, जे वापरकर्त्यांना वास्तविक स्टोरेज आवश्यकतानुसारे स्टोरेज क्षमता सुधारित करण्यास परवानगी देते. वापरकर्ते आत्ता शेअर्ड स्टोरेज पूलपासून थिनलि-प्रोव्हिजन्ड वॉल्युम्स निर्माण करू शकतात. पूलमधील ब्लॉक्सचे वाटप तेव्हाच होते जेव्हा वॉल्युम लिहले जाते, व वॉल्युममधील डाटा वगळले जाते तेव्हा ब्लॉक्सला पूलकरिता पुन्हा पुरवले जाते. ह्या व्यतिरिक्त, स्नॅपशॉट्स, किंवा पॉइंट-इन-टाइम प्रत, वॉल्युमवरील डाटाकरिता क्षणीकरित्या प्रवेश पुरवते. हे खोडून लिहण्यापूर्वी डाटा साठवून शक्य आहे.

मल्टिपात I/O सुधारणा

डिव्हास मॅपर मल्टिपात याचे स्केलेबिलिटि व सोपा वापर सुधारित केला आहे. ह्या सुधारणांमध्ये खालील समाविष्टीत आहे:
 • युटिलिटिजचा प्रतिसाद,
 • मल्टिपात साधन स्वयं नामांकन,
 • जास्त दणकट मल्टिपात लक्ष्य शोध.

GFS2 मध्ये कामगिरि सुधारणा

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये Orlov ब्लॉक अलॉकेट समाविष्टीत आहे जे एकमेकांशी परस्पर आणि संभाव्य एकत्रीत प्रवेशजोगी फाइल्सकरिता लोकॅलिटि पुरवते. ह्या व्यतिरिक्त, रिसोर्स गट जास्त तंटास्पद ठरते, वेगळ्या गटचा वापर कामगिरी वाढवण्याकरिता होतो.

mdadm मधील TRIM समर्थन

mdadm साधन आत्ता RAID0, RAID1, RAID10 आणि RAID5 करिता TRIM आदेशला समर्थन पुरवते.

Chapter 7. क्लस्टरिंग

pcs संपूर्णतया समर्थीत

pcs संकुल, पूर्वी तेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केलेले, आत्ता Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये संपूर्णतया समर्थीत आहे. हे संकुल corosync आणि pacemaker युटिलिटिज संरचीत व व्यवस्थापीत करण्यासाठी आदेश-ओळ साधन पुरवते.

pacemaker संपूर्णतया समर्थीत

पेसमेकर, एक स्केलेबल उच्च-स्तरीय क्लस्टर रिसोअर्स व्यवस्थापक, ज्यास पूर्वी टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले गेले होते, आत्ता संपूर्णतया समर्थीत आहे.

Chapter 8. हार्डवेअर समर्थन

संभाव्य Intel SOC प्रोसेसर्सचे समर्थन

भावी Intel सिस्मट-ऑन-चिप (SOC) प्रोसेसर्सकरिता कार्यप्रणालीमध्ये साधन समर्थन सुरू केले आहे. ह्यामध्ये ड्युअल ॲटण प्रोसेसर्स, मेमरि कंट्रोलर, SATA, युनिवर्सल असिंक्रोनस रिसिव्हर किंवा ट्रांसमिटर, सिस्टम मॅनेजमेंट बस (SMBUS), USB आणि Intel लेगसि ब्लॉक (ILB - lpc, टाइमर्स, SMBUS (i2c_801 मॉड्युल)) समाविष्टीत आहे.

12Gbps LSI SAS साधनचे समर्थन

Red Hat Enterprise Linux मध्ये LSI पासून mpt3sas ड्राइव्हर 12Gbps SAS साधनांकरिता समर्थन समाविष्ट करते.

डायनॅमिक हार्डवेअर विभाजन व सिस्टम बोअर्ड स्लॉट रेकॉगनिशनकरिता समर्थन

डायनॅमिक हार्डवेअर विभाजन आणि सिस्टम बोअर्ड रेकॉगनिशन गुणधर्म उच्च स्तरीय प्रणाली मिडलवेअर किंवा पुन्हसंरचनाकरिता ॲप्लिकेशन्स्ला सतर्क करते आणि वापरकर्त्यांना विना रिबूट अगाऊ वर्कलोडकरिता समर्थन पुरवते.

भावी Intel 2D आणि 3D ग्राफिक्सकरिता समर्थन

भावी Intel 2D आणि 3D ग्राफिक्स समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे भावी Intel प्रोसेसर्सचा वापर करणाऱ्या प्रणालींना Red Hat Hardware Certification प्रोग्रामतर्फे सर्टिफिकेश शक्य होते.

फ्रिक्वेंसि सेंटिविटि प्रतिसाद मॉनिटर

फ्रिक्वेंसि सेंसिटिविटि प्रतिसाद मॉनिटर कार्यप्रणालीला उत्तम माहिती पुरवते ज्यामुळे पावर साठवतेवेळी उत्तम फ्रिक्वेंसि बदल शक्य होतील.

ECC मेमरि समर्थन

एरर-करेक्टिंग कोड (ECC) मेमरिला भविष्यातील AMD प्रोसेसर्सकरिता समर्थीत केले आहे. हे गुणविशेष ECC मेमरि संबंधीत काउंटर्स व स्थिती बिट्सकरिता त्रुटींकरिता कामगिरी व एरर तपासणी करण्यास सुविधा पुरवते.

1TB मेमरिपेक्षा जास्त AMD प्रणालींकरिता समर्थन

कर्नल आत्ता AMD प्रणालींवरील 1TB RAM पेक्षा जास्त मेमरि संरचनाकरिता समर्थन पुरवतो.

Chapter 9. व्यवसायीक मानक व सर्टिफिकेशन

FIPS 140 रिवॅलिडेशन्स

फेडरल इंफॉर्मेशन प्रोसेसिंग स्टँडर्डस (FIPS) प्रकाशन 140 U.S. सरकारचे सुरक्षा धोरण आहे जे सुरक्षा आवश्यकता निर्देशीत करते, आणि ज्याची सुरक्षा प्रणाली अंतर्गत क्रिप्टोग्राफिक घटकातर्फे पूर्तता व्हायला हवी, ज्याचा वापर संवेदनशील, परंतु विनावर्गीकृत माहितीच्या संरक्षणकरिता केला जातो. मानक चार वाढीव, सुरक्षाचे दर्जेदार स्तर पुरवतो: स्तर १, स्तर २, स्तर ३ आणि स्तर ४. ह्या स्तरांमध्ये संभाव्य ॲप्लिकेशन्स आणि वातावरण समाविष्टीत आहेत ज्यामध्ये क्रिप्टोग्राफिक घटकांचा वापर होऊ शकतो. सुरक्षा धोरणात सुरक्षित रचना आणि क्रिप्टोग्राफिक घटकाच्या लागूकरणशी संबंधीत क्षेत्र समाविष्टीत आहेत. ह्या क्षेत्रांमध्ये क्रिप्टोग्राफिक घटक निर्देशन, क्रिप्टोग्राफिक घटक पोर्ट्स आणि संवाद; रोल्स, सर्व्हिसेस, आणि ओळख पटवण्याच्या पद्धती; फायनाइट स्टेट मॉडल; वास्तविक सुरक्षा; ऑपरेशनल वातावरण; क्रिप्टोग्राफिक कि व्यवस्थापन; इलेक्ट्रोमॅगनेटिक इंटरफरेंस/इलेक्ट्रोमॅगनेटिक कॉमपॅटिबिलिटि (EMI/EMC); स्वयं-चाचणी; मांडणीची खात्री; आणि इतर धोक्यांपासून सुरक्षा समाविष्टीत आहे.
Red Hat Enterprise Linux 6.5 NSA स्विट B क्रोप्टोग्राफि सुधारणा व सर्टिफिकेशन्सकरिता समर्थन पुरवतो. हे क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम्स सर्वात जास्त सुरक्षित नेटवर्किंग संवाद पुरवतात. NSA SUITE B सरकारी एजंसिजतर्फे NIST 800 - 131 अंतर्गतआवश्यक आहे. NSA स्विट B क्रिप्टोग्राफिच्या घटकांमध्ये खालील समाविष्टीत आहे:
 • ॲडवांस्ड एनक्रिप्शन स्टँडर्ड (AES) एनक्रिप्शन GCM मोड ऑफ ऑपरेशन
 • एल्लिपटिक कर्व्ह डिफ्फि-हेल्लमन (ECDH)
 • सेक्युर हँश अल्गोरिदम २ (SHA-256)
खालील लक्ष्यांची तपासणी होत आहे:
 • NSS FIPS-140 स्तर १
 • स्विट बी एल्लिपटिक कर्व्ह क्रिप्टोग्राफि (ECC)
 • OpenSSH (क्लाएंट आणि सर्व्हर)
 • Openswan
 • dm-crypt
 • OpenSSL
 • कर्नल क्रिप्टो
 • AES-GCM, AES-CTS, AES-CTR सिफर्स

FSTEK सर्टिफिकेशन

परवाना माहिती सुरक्षा तंत्राच्या व्यतिरिक्त, FSTEK एजंसि कंट्रि एक्सपोर्ट कंट्रोल रेजिम पहाते, दोन्ही नागरी आणि लष्करी ॲप्लिकेशन्सकरिता वापरण्याजोगी दुहेरी-वापर तंत्राचे एक्सपोर्ट नियंत्रण देखील समाविष्टीत आहे.
परकीय विक्रेत्यांना FSTEK सर्टिफिकेशन न्यायव्यवस्था आवश्यक आहे, जर उत्पादन व्यक्तिगत माहितीचा वापर, साठवणे किंवा विश्लेषीत करत असल्यास आणि रशियन फेडरेशनमध्ये Red Hat ब्रँड अंतर्गत संघीय आणि व्यापारिक विक्री कायदेशीर करते.
FSTEK प्रमाणपत्र ठराविक Red Hat Enterprise Linux 6 किर्कोळ प्रकाशनवर आधारित नाही आणि अशा प्रकारे संपूर्ण Red Hat Enterprise Linux 6 प्रकाशनकरित परवानगी दिली जाईल.

Chapter 10. डेस्कटॉप्स आणि ग्राफिक्स

ग्राफिक्स सुधारणा आणि नवीन हार्डवेअर समर्थन

Red Hat Enterprise Linux 6.5 मधील ग्राफिक्स सुधारणामध्ये खालील समाविष्टीत आहे:
 • भावी Intel आणि AMD साधनांकरिता समर्थन
 • स्पाइस सुधारणा
 • सुधारित बहु मॉनिटर समर्थन आणि टच स्क्रीन समर्थन

सुधारित gdm

gdm ॲप्लिकेशनकरिता सुधारणांमध्ये पासवर्ड एक्सपिरेशन संदेशकरिता निवारण, मल्टि-सिट समर्थन आणि स्थानीय इंटरऑपरेबिलिटि अडचणी समाविष्टीत आहे

सुधारित एव्होल्युशन

एव्हल्युशन ॲप्लिकेशनला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरिता सुधारित केले आहे ज्यामुळे Microsoft Exchange सह इंटरऑपरेबिलिटि सुधारित होते. ह्यामध्ये नवीन एक्सचेंज वेब सर्व्हिस (EWS), सुधारित सभासत्र समर्थन व सुधारित फोल्डर समर्थन समाविष्टीत आहे.

LibreOffice रिबेस केले

Red Hat Enterprise Linux 6.5 प्रकाशनमध्ये, LibreOfficeला अपस्ट्रिम आवृत्ती 4.0.4 करिता सुधारित केले आहे.

AMD GPUs करिता समर्थन

Red Hat Enterprise Linux 6.5 मध्ये सर्वात नवीन AMD ग्राफिक्स प्रोसेसर युनिट्स (GPUs) करिता समर्थन समाविष्ट केले आहे

NetworkManager मध्ये अलायस समर्थन

NetworkManager करिता अलायस समर्थन समाविष्ट केले आहे. तरी, वापरकर्त्यांना एकापेक्षा जास्त किंवा त्याऐवजी द्वितीय IP गुणविशेषचा वापर शिफारसीय आहे.

Chapter 11. कामगिरी आणि मापनीयता

KSM सुधारणा

नॉन-युनिफॉर्म मेमरि ॲक्सेस (NUMA) प्रवेश गृहीत धरण्यासाठी पृष्ठांना संलयन करताना कर्नल शेअर्ड मेमरि (KSM)ला सुधारित केले आहे, ज्यामुळे प्रणालीवरील ॲप्लिकेशन्स सुधारित केले जाते. तसेच, Red Hat OpenShift करिता ॲप्लिकेशन्सची तीव्रता वाढवण्याकरिता अगाऊ पृष्ठ प्रकार समाविष्ट केले आहेत.

tuned सुधारणा

ठराविक घटनांकरिता tuned प्रोफाइल्स्ला कमाल कामगिरी पुरवण्यासाठी सुधारित केले आहे.

Chapter 12. कंपाइलर व साधने

ऑटोमॅटिक बग रिपोर्टिंग टूल (ABRT), रिपोर्टर्सच्या पूर्वनिर्धारित संचमध्ये बदल

abrt-cli --report DIR आदेश आत्ता चालवल्यानंतर खालील रिपोर्टर्सचे विकल्प उपलब्ध करतो:
तुम्हाला अडचण कशा प्रकारे रिपोर्ट करायला आवडेल?
 १) नवीन Red Hat सपोर्ट घटना
 २) अस्तित्वातील Red Hat सपोर्ट घटना
 ३) टार आर्काइव्हमध्ये साठवा

कम्पोनंटची आवृत्ती

हे परिशिष्ट घटकांची व Red Hat Enterprise Linux 6.5 प्रकाशनातील परस्पर आवृत्तींची सूची आहे.
कम्पोनंट
आवृत्ती
कर्नल
2.6.32-421
QLogic qla2xxx ड्राइव्हर
8.04.00.08.06.4-k
QLogic ql2xxx फर्मवेअर
ql23xx-firmware-3.03.27-3.1
ql2100-firmware-1.19.38-3.1
ql2200-firmware-2.02.08-3.1
ql2400-firmware-7.00.01-1
ql2500-firmware-7.00.01-1
एम्युलेक्स lpfc ड्राइव्हर
8.3.7.21.1p
iSCSI इनिशिअटर युटिल्स्
iscsi-initiator-utils-6.2.0.873-9
DM-मल्टिपात
device-mapper-multipath-0.4.9-71
LVM
lvm2-22.02.100-4
Table A.1. कम्पोनंटची आवृत्ती

आवृत्ती इतिहास

Revision History
Revision 1.0-7Thu Nov 21 2013Eliška Slobodová
Release of the Red Hat Enterprise Linux 6.5 Release Notes.
Revision 1.0-3Thu Oct 3 2013Eliška Slobodová
Release of the Red Hat Enterprise Linux 6.5 Beta Release Notes.